बावनबिर येथील ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास सहकार पॅनलचा दणदणीत विजय
स्थानिक दिग्गज नेत्यांचे शेतकरी विकास आघाडीला एकही जागा घेता आले नाही. ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या स्थापने पासून म्हणजे गेल्या ५० वर्षापासून वा.रा.पिसे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शालिग्राम हागे, तसेच जिल्हा कॉग्रेसचे चिटणीस संजय ढगे यांचं वर्चस्व असलेल्या पुढार्यांचा दारुण पराभव,
संग्रामपूर ; -
बावनबिर येथील ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या सदस्य करिता निवडणूक पार पडली यामध्ये शेतकरी विकास सहकार पॅनलचा दणदणीत विजय संपादन केले तर स्थानिक दिग्गज नेत्यांचे शेतकरी आघाडीला एकही जागा मिळालेली नाही. भाजपा जिल्हा सचिव श्याम आकोटकार,दीपक पाटील, गजाननदादा पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास दर्शविला.
सविस्तर वृत्त असे की,राजकारण कार्यक्षेत्रातील केंद्रबिंदू असलेल्या बावनबिर जिल्हा परिषद सर्कल च्या गावातील ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या १३ सदस्य करिता शेतकरी विकास ससहकार पॅनल चे १३ तर स्थानिक दिग्गज नेत्यांचे शेतकरी आघाडी पॅनलचे १३ आणी एक अपक्ष असे एकूण २७ उमेदवार रिंगणात उतरले होते. रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ४ पर्यंत मतदान निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रतिष्ठेच्या मिनी सहकार क्षेत्रातील सभासद असलेल्या मतदारांनी पसंतीच्या आघाडीतील उमेदवारांना मतदान करुन भवितत्त्व मतपेटीत बंद केले,या निवडणुकीचा निकाल संध्याकाळी ५ वाजता नंतर मतमोजणी करून निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार जाहीर केले. ग्रामसेवा सहकारी संस्था निवडणुकीत शेतकरी विकास सहकार पॅनलचे
१)इतर मागासवर्गीय मतदारसंघातुन गजाननदादा पाटील
२) अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातुन, नागेश कांबळे
३) भटके विमुक्त मतदारसंघातुन रामेश्वर पुंडे
४) महिला मतदारसंघातुन सौ.सुनिता दिलीप कचरे (पळसोडा) ,सौ.लता आनंदा पाटील (पंचाळा)
५) कर्जदार मतदारसंघातुन
गोपाल अग्रवाल,निलेश काळे,विजय कुचेकर(पळसोडा),ज्ञानदेव गाडगे(उमरा),जमीरोद्दीन हमीनोद्दीन, नंदकिशोर भगत,प्रल्हाद मनसुटे,केशव हागे,असे एकुण १३ उमेदवार दणदणीत विजयी मिळवला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज ज्येष्ठ नेते वा.रा.पिसे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शालिग्राम हागे तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय ढगे यांच्या शेतकरी आघाडी पॅनलला खातंही खोलता आलेलं नाही.
भाजपा जिल्हा सचिव श्याम अकोटकार, दीपक पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामा घायल तसेच बावनबीर, पळसोडा, उमरा आणि पंचाळा येथील शेतकरी विकास सहकार पॅनलच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी यांनी या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत शेतकऱ्यांची मिनी बँक असलेल्या संस्थेवर वर्चस्व ठेवले