Breaking News
recent

पळशी खुर्द येथे वीज पडून ८ बकऱ्या ठार, खामगाव तालुक्यात पावसाची अवकाळी हजेरी


    बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान पळशी खुर्द येथे अंगावर वीज पडून ७ बकऱ्या ठार झाल्या.हवामान खात्याने दर्शवलेला अंदाज खरा ठरवित आज सात एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

    खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे आणि आंब्यांचेही नुकसान झाले आहे. पळशी खुर्द शिवारात भिकाजी लोखंडे यांच्या शेतात वीज पडून ७ बकऱ्या जागीच ठार झाल्या. यामध्ये विजय गव्हाळे यांच्या २, श्रीकृष्ण इंगळे यांच्या ४ तर रवींद्र अढाव यांच्या एका बकरीचा समावेश आहे.

Powered by Blogger.