Breaking News
recent

हाणेगाव ते बिजलवाडी रस्त्याची चारच दिवसात दयनीय अवस्था...


रस्ता जुना आहे की नवीन हेच कळेना


हाणेगाव प्रतिनीधी

 तालुक्यात सर्वाधीक लोकसंख्या व मोठा बाजार पेठ असलेला गाव म्हणुन हाणेगावला संबोधला जातो कारण की परीसरातील जवळजवळ २५ ते ३० गाव  याच्या लगत असुन एक मोठा सर्कल म्हणुन परीचीत आहे येथुनच खुतमापुर बिजलवाडी हाणेगाव हा जोड रस्ता असुन येथुन  पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातुन  नविनच डांबर रोड कामाची  मान्यता मिळुन कामाला सुरवात झाली आहे.

 येथील रस्त्याचा चारच दिवसापुर्वी  जळपास काम  पुर्ण झाला असला तरी हा रस्ता नवीन रस्ता की जुना  हेच कळेनास  झालं आहे रस्त्यावर लागणारं साहीत्याचा वापर फारच कमी प्रमाणात असुन लगेच रस्ता उघडा पडला आहे परिसरातील  गावच्या लोकांचा रोजच दैनंदीन कामासाठी येजा असतो शैक्षणीक व्यापारीक कामानिमीत्त लोकांची वाहनांची नेहमीच वरदळ येथुन चालु असते स्वातंत्र्या नंतर  प्रथमच या कामाला मान्यता मिळाली असुन सर्व नागरीकांची इच्छा आहे की रस्त्याचं काम व्यवस्थीत व दर्जेदार व्हायला पाहीजे पण गुत्तेदार व संबंधीत बांधकाम विभागाच्या संगनमतानं काम व्यवस्थीत दर्जेदारपणे होत नाही तर अत्यंत निकृष्ठ  दर्जाचे काम करत आहेत  एकीकडे संबंधीत विभाग लाखो रुपये मंजुर करुन कामाला मान्यता जरी दिला खरा पण रस्त्याचा काम आज दर्जेदार होत नाही "चार दिन की चांदनी फिर वही अंधेरी रात" म्हणी प्रमाने रस्त्याला मान्यता मिळाली रस्ता झाला चारच दिवसात उघडा पडला नाविलाजानं जीवन लोकांना जगावं लागतो आहे परीसरातील राजकीय पुढारी संबंधीत बांधकाम विभाग या कामाकडे लक्ष देऊन रस्त्याचा काम दर्जेदार करावा अस परीसरातील नागरीक चर्चा करताना दिसते आहे.

Powered by Blogger.