Breaking News
recent

शिक्षकी पेशाला काळिमा! चौथीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलींवर दोन नराधम शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार

  


    अकोला : जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात धामणदारी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गातील चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर दोन नराधम शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

धामणदरी येथे जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत चौथ्या वर्गात शिकत असलेल्या ४ विद्यार्थिनींवर त्यांच्याच शाळेतील दोन शिक्षकांकडून सतत अश्लील चाळे होत होते. दोन्ही शिक्षक मुलींना एकटे पाहून कुकर्म करत होते. वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे अल्पवयीन मुलींच्या मनात भीती पसरली. त्यामुळे पीडित मुली शाळेत जात नव्हत्या.

पालकांनी त्यांना शाळेत न जाण्याचे कारण विचारल्यावर त्या चौघींपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. हे ऐकताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडित मुलींच्या तक्रारीनंतर शिक्षक राजेश रामभाऊ तायडे (४५), सुधाकर रामदास ढगे (५३) दोघेही रा. अकोला यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Powered by Blogger.