अंभोरा येथील पाणपोई भागविते तहान गोरक्षनाथ खाकाळ यांचा १५ वर्षांपासून यात्रेकरूंसाठी उपक्रम
पनवेल प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे येथे गेल्या १५वर्षांपासून गोरक्षनाथ खाकाळ हे पाणपोई उभारून यात्रेकरूंची तहान भागवत आहेत. त्यामुळे यात्रेतील भाविकांची सोय होत आहे. अंभोरा येथील ग्रामदैवत आंबेश्वराची यात्रा चैत्र महिन्यात असते या महिन्यांमध्ये कडकडीत असा उन्हाळा असतो . या यात्रेमध्ये बाहेर जाऊन आलेले यात्रे करून व गावातील ग्रामस्थांच्या पिण्याचे पाण्याची व्यवस्था यात्रेमध्ये व्हावे या उद्देशाने गोरक्षनाथ खाकाळ हे गेल्या पंधरा वर्षापासून पाणपयी उभारून यात्रेकरूंची तहान भागवण्याचे काम करीत आहेत.
गोरक्षनाथ खाकाळ यांनी बी. एड. पदवी घेतली नोकरीच्या मागं न लागता सामाजिक कार्याबरोबर व्यवसायात सक्रिय झाले. पुणे शहरात बांधकाम क्षेत्रात त्यांनी चांगला जम बसविला आहे.गावाची बांधिलकीकायम जपलीआहे. गावातीलप्रत्येक कार्यक्रमात त्यांचा गोरक्षनाथ खाकाळ सहभाग अंभोरा सक्रिय असतो. येथील ग्रामदैवत अंबेश्वरची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात असते. या यात्रेला परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने येत असतात. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते. भाविकांची ही गरज ओळखून गोरक्षनाथ खाकाळ यांनी पाणपोई उभारली. खाकाळ हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या परिसरात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गावातील तरुणांना करिअरबाबतही ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या या समाजिकउपक्रमांचे परिसरात कौतुक होत आहे.