बुलढाणा अर्बनच्या टूनकी शाखेत चौरीचा प्रयत्न : अज्ञाताविरूध्द गुन्हा
सोनाळा ■ टुनकी बाजारपेठ येथे भरवस्तीत बुलढाणा अर्बन पतसंस्थेची शाखा आहे . अज्ञात चोरट्याने शटरची पट्टी तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ एप्रिलच्या मध्यरात्री घडली आहे. शाखाधिकारी मनोज मोहनलाल गांधी यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध अप नं ८५ / १३ कलम ३८०, ५११ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे .
सातपुड्याच्या पायथ्याशी टुनकी ही आदिवासी परिसराची मुख्य बाजारपेठ आहे. या गावात पोलीस मदत केंद्र आहे. याच्या २०० फुटावर दशरथ गावंडे यांच्या जागेत बुलढाणा अर्बन शाखा आहे. हे पोलीस मदत केंद्र पोलीसा अभावी बंद असते. येथील बीट जमदार दोन प्रभार सांभाळत आहेत . त्यामूळे ते पो.स्टे. कामाने नेहमी बाहेर गावी बुलढाणा असतात. बुलढाणा अर्बनच्या शाखेत मोठ्या प्रमाणात व्यवहार व सोने चांदी दागिने गहाण ठेवून शेतकरी आदिवासी कर्ज घेतात. परिणामी अज्ञाताने या शाखेचे मुख्य रस्त्यावरील छटरची पट्टी तोडली व आत प्रवेश केला.
मात्र शाखेतील सायरन वाजल्याने चोरट्याने पळ काढला. व मोठी चोरीची घटना टळली. या गावात पोलीसांची गस्त वाढवावी. व पोलीस मदत केंद्रावर पूर्णवेळ पोलीस कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी आहे