पनवेल मध्ये रिक्षा चालकावर कारवाईला सुरुवात.
प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नियम पाळण्या संदर्भात मार्गदर्शन
संतोष आमले पनवेल प्रतिनिधी
पनवेल आरटीओने रिक्षा चालकावर कारवाई करण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. वर्दी न घालणे, बॅच न लावणे, मीटर प्रमाणे रिक्षा न चालवणे, लायसन्स नसणे आदी नसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदी परिसरात आरटीओने रिक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईला रिक्षा चालकांनी विरोध दर्शवला आहे. अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ तर्फे सांगण्यात आले आहे
27 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून अनिल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटो रिक्षाची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पनवेल रेल्वे स्टेशन ईस्ट साईड, पनवेल रेल्वे स्टेशन वेस्टसाइड, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, मानसरोवर रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व सर्व कार्यकारी अधिकारी यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेअंतर्गत एकूण 415 वाहने तपासली. व तपासणी अंतर्गत एकूण 123 दोशी रिक्षा आढळल्या. व एकूण 15 वाहने विविध ठिकाणी अटकावून ठेवली. या तपासणी मोहिमे अंतर्गत मीटर प्रमाणे भाडे नाकारणे, मीटर सील नसणे, मीटर सदोष, रिफ्लेक्टर नाही, जादा प्रवासी, प्रवाशांची उद्धटपणे वागणे, भाडे नाकारणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, परवाना नाही इत्यादी कारणासाठी ही तपासणी मोहिम राबवण्यात आली होती. सर्व कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. पनवेल रेल्वे स्टेशनवर रिक्षा वाहन चालक एकत्र करून त्यांना रस्ता सुरक्षाचे महत्व व प्रवाशांसोबत सौजन्याने वागण्यासंदर्भात व मीटर प्रमाणे भाडे आकारणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.