छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आंबोडा येथे भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न
प्रतिनिधी नांदुरा
आज दिनांक १४ मे २०२३ रोजी नांदुरा तालुक्यातील आंबोडा या गावात तरुणांनी एक नवा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन छत्रपती संभाजी महाराजांची जयंती हे सामाजिक उपक्रम राबवत साजरी केली. छत्रपती संभाजीराजे मंडळ आंबोडा यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,त्याकरिता डॉ.शरद पाटील यांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर व डॉ पुरुषोत्तम राऊत यांचे मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हे शिबिर सकाळी ९ ते २ या वेळेत ठेवले असून या शिबिराचा १५० गावकऱ्यांनी लाभ घेतला.
यावेळी आंबोडा येथील सरपंच सुनंदा एकनाथ मापारी,तेजराव राऊत ग्रा. पं.सदस्य त्रयंबक राऊत, अनंत राऊत,शिवचरण भोंगे,गणेश राऊत,एकनाथ मापारी ,रमेश राऊत,शिवाजी राऊत,वैभव भोंगे,रघुनाथ राऊत,सुपडा वासनकर, न्याजलिशाह,शत्रुघ्न राऊत ,उमेश भोंगे,तानाजी भगत,गजानन सुलतान,गोपाल भोंगे,प्रवीण राऊत,गणेश भोंगे, अजबराव राऊत, सोपान भोंगे,राजू राऊत,गजानन मापरी,सुनील मापारि, गोपाल राऊत, प्रसन्नजीत राऊत,सागर चांभारे,गौरव राऊत,प्रभाकर राऊत असंख्य शंभुप्रेमी उपस्थित होते.या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष तथा स्वराज्य बहुउद्देशिय पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर रमेश पाटील,संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे व नांदुरा शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर यांनी धावती भेट देऊन कार्यक्रमाची प्रशंसा केली.