ऋतुजा तेलंगे हिने नीट परीक्षेत मिळविले 720 पैकी 592
कंधार प्रतिनिधी दिगंबर तेलंगे
कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील रहिवासी ऋतुजा बालाजी तेलंगे या विद्यार्थिनीने नीट च्या परीक्षेत 720 पैकी तब्बल 592 गुण प्राप्त केली आहे ऋतुजा हिने मेहनत जिद्द चिकाटीने नीट मध्ये 720 पैकी 592 मिळविले वडील बालाजी तेलंगे शिक्षक व आई शिक्षिका असल्याने ऋतुजाला चांगलं मार्गदर्शन मिळाल्याने ऋतुजा अभ्यासात चांगली हुशार झाली
टाइनी एनलस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लक्ष्मी नगर वाडी बुद्रुक नांदेड येथे बारावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होऊन तिने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाने व आपल्या मेहनतीच्या बळावर ऋतुजा ने नीट मध्ये 720 पैकी 592 गुण प्राप्त करून यशोशिखर गाठल्याने काटकंबा परिसरात तिचं कौतुक होत आहे