गोठेघर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व सरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
कल्याण प्रतिनिधी अविनाश कापडणे
शहापूर तालुक्यातील गोठेघर ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी दिलीप गोविंद इंगळे वय 51, सरपंच कुमारी रुचिता भालचंद्र पिंपळे वय 26 या लोकसेवकांना ठाणे अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने गोठेघर ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहात पकडले आहे.
गोठेघर ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामण प्लाझा दरम्यान पिण्याच्या पाईप लाईनचे केलेल्या कामाचे बिल 1 लाख 23 हजार 175 रुपये मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सरपंच पिंपळे यांनी 23 हजार रुपये तर ग्रामविकास अधिकारी इंगळे यांनी 5 हजार अशी मागणी संबंधित तक्रारदार यांच्याकडे केली होती. तडजोडी अंती सरपंच यांना 20 हजार तर ग्राम विकास अधिकारी यांना 500 रुपये अशी लाच स्वीकारताना 27 जुन रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास गोठेघर ग्रामपंचायत कार्यालयात ठाणे अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.