Breaking News
recent

शहापूरमधील शेतकऱ्यांना मनसेतर्फे खत वाटप



 कल्याण प्रतिनिधी अविनाश कापडणे

       सुरु असलेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साधनांची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शहापूर तालुका मनसेचे सचिव हरिचंद्र खंडवी यांच्या संकल्पनेतून आणि शहापूर मनसेच्या वतीने  तालुक्यातील शेतकऱ्यांना वैश्य समाज सभागृहात एका समारंभात मोफत खत कुपणचे वाटप करण्यात आले आले. या कुपणांवर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोफत खत मिळणार आहे.

       यावेळी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंबई नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, यासंदर्भात रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा यावेळी बोलताना दिला. याप्रसंगी ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष शैलेश बिडवी, शहापूर तालुका अध्यक्ष विजय भेरे, दिलीप भोपतराव, हरिश्चंद्र खंडवी, जयवंत मांजे, राकेश वारघडे, रुपेश गुजरे, विक्रांत मांजे, दयानंद पाटोळे उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित सूमारे १२०० शेतकऱ्यांना खत कुपणांचे वाटप करण्यात आले.


Powered by Blogger.