Breaking News
recent

यशवंत विद्यालय पंढरपूर येथे शालेय दिंडीचे आयोजन

 


पंढरपूर (प्रतिनिधी ) 


आज दि. 28 जुन रोजी यशवंत विद्यालयातर्फे आषाढी वारी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी शासकीय वसाहत येथील भागात काढण्यात आली होती.तत्पूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी भजन कीर्तन केले. या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला . वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद घेतला. आणि शेवटी विद्यार्थी शिक्षक यांनी रिंगण सोहळ्यात सहभाग घेऊन शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोरे साहेब , मुख्याध्यापिका साळवे मॅडम, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Powered by Blogger.