ज्येष्ठ कार्यकर्ता सन्मान सोहळा संपन्न.
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे ३० मे रोजी ९ वर्ष पूर्ण झाली असून या निमित्ताने ३० मे ते ३० जून पर्यंत विशेष जनसंपर्क अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठांचा अनुभव विकासासाठी, प्रगतीसाठी आणि पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी नेहमीच उपयुक्त ठरतो.सदर संमेलनात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेली मते आणि विचार पुढील कार्यासाठी उपयुक्त ठरतील. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष बनवण्यात मोलाचा वाटा असलेल्या ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान केला.भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आताच्या तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे आहेत. भाजपा नावाचे छोटेसे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. भाजपाचा वटवृक्ष करण्यामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आणि आता त्याच पक्षाच्या माध्यमातून देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आता सेवा, सुशासन, प्रगती आणि गरीबांचे कल्याण करीत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला मोठे करण्यासाठी आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण वेचले. त्याच पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला मोठे करण्याचे काम अहोरात्र करीत आहेत.
भाजपाची ओळख नेहमीच कार्यकर्त्यांमुळे कायम राहिली आहे. ईतर पक्षांसाठी त्यांचा परिवार हे सर्वस्व आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राष्ट्र हे त्याचा परिवार आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भविष्याचा वेध घेत विचारमंथन करावे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद प्राप्त करावे यासाठी आजचे संमेलन महत्वाची असल्याचे सांगितले. देशात विषारी विचार पेरण्याचे काम सुरू आहे. असे विषारी विचार पेरणाऱ्या पक्षांना हद्दपार करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन केले.
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकाच्या एकजूटीतून हा संकल्प सामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचावा. विकासाची मोठी जबाबदारी आपण सर्व पेलत आहोत. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक अशा सर्वच बाजुने आपला मतदार संघ कसा विकास करेल यावर जोर द्यायचा आहे, आपल्या मतदार संघाने नेहमीच विविध सकारात्मक कामांच्या बाबतीत व मतदारसंघात विकासाला सर्वोच्च स्थान कायम ठेवण्याचा आपला कायम प्रयत्न आहे. बैठकीत देशगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या विकास कामाची उपस्थितांना माहिती देत, मनमुरादपणे गप्पा मारल्या