आषाढी वारी पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
मंगळवेढा ( प्रतिनिधी ) :-
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (रजि) दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी वारी पायी दिंडी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणून मंगळवेढा ब्रांच च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची रक्ताच्या बाबतीत गैरसोय होऊ नये.रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा लवकर उपलब्ध व्हावा यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे तसेच मंगळवेढा नगरपरिषद सीईओ निशिकांत परचंडराव साहेब, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर जिल्हा प्रमुख इंद्रपालसिंह नागपाल, मंगळवेढा शाखेचे मुखी युवराज कोळी, ज्ञानप्रचारक चांदभाई तांबोळी, सेवादल संचालक अनिल माने, सेवादल शिक्षक पोपट काशिद, महिला सेवादल इंचार्ज लता माने, व सर्व सेवादल महापुरुष व माता बहेनजी उपस्थित होते. याप्रसंगी एकुण 80 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्त संकलित करण्यासाठी सोलापूर येथील दमाणी ब्लड बँक व पंढरपूर येथील सरजुबाई बजाज रक्तपेढी यांनी ती जबाबदारी पार पाडली. संत निरंकारी मिशनची पार्श्वभुमी व संत निरंकारी मंडळाचा संपुर्ण इतिहास संतोष सोनवले यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गिरीश जाधव यांनी केले.