६० वर्षीय इसम बेपत्ता.
चिखली(प्रतिनिधी)
तालुक्यातील भरोसा येथील एक ६० वर्षीय इसम दिनांक ६ जून रोजी घरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघुन गेले असून ११ दिवस उलटूनही त्याच्या बद्दल कुठलीच माहिती प्राप्त झाली नसल्याने त्यांचा मुलगा नागेश गणेश थुट्टे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
गणेश थुट्टे वय (६०) हे पत्नी सौ. रंजना थुट्टे,मुलगा नागेश थुट्टे आणि सुनबाई शितल थुट्टे यांचेसह भरोसा येथे राहतात. आणि शेती व्यवसाय करतात. गणेश श्रीराम थुट्टे हे शेतीचा कामधंदा करुन गुरु ढोरे चारण्याचे काम करतात. व त्यांना दारु पिण्याचे व्यसन असुन ते नेहमी दारू पितात. दि.०६/०६/२०२३ चे सकाळी ७.३० वाजे दरम्यान गणेश श्रीराम थुट्टे वय ६० वर्षे यांनी अंघोळ केली.व घरामधुन निघुन गेले. जाताना कोणालाही काही एक सांगितले नाही. गणेश थुट्टे हे दारु पिवुन ग घरी आले कि. लहान सहान गोष्टीवरून घरामध्ये किर किर करत होते. व त्यांना दारु पिण्यासाठी रोज शंभर रुपये दयावे लागत होते. ते दिले नाहीतर ते घरामध्ये भांडण झगडा करीत होते . या अगोदर सुध्दा ते काही वर्षापुर्वी कोणाला काही एक न सांगता निघुन गेले होते. व ते मुक्ताबाईचे पालखीत सापडले होते . आजु बाजुचे गावात शोध घेतला असता ते मिळुन आले नाही असे मुलगा नागेश यांनी पोलीसस्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यांचे वर्णेन खालील प्रमाणे आहे. रंगनिमगोरा, उंची 5.5 फुट, कपडे पायजमा शर्ट व गळ्यामध्ये लांब रुमाल, तसेच बिडी पिण्याची सवय, पायात दाढी मिशी दाटलेली आहे. अशी व्यक्ती मिळाल्यास जवळच्या पोलीसस्टेशनला कळवावे असे अ़ढेरा पोलीसस्टेशनचे ठाणेदार हिवरकर साहेब यांनी कळविले.