दिपाली झुगरे यांच्या हस्ते भजन साहित्य व डी.जे.संचचे वाटप
कल्याण प्रतिनिधी
ठाणे जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या माजी सभापती दिपाली झुगरे यांच्या हस्ते पंचायत समिती शहापुर येथे भजन साहित्य व डी.जे.संचाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात शहापूर तालुक्यातील अल्याणी,मुसई(कृष्णाची वाड़ी), आवळे,माहुली,पत्र्याचापाड़ा गावांसाठी हे साहित्य मंजूर केले होते.नुकताच या साहित्याचा वाटप समारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांनी दिपाली झुगरे यांचे आभार व्यक्त केले.दरम्यान अल्याणी ग्रामस्थांसाठी भजन साहित्य उपलब्ध करुण देण्यासाठी त्यांना विशेष सहकारी मळेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे,युवासेना शहापुर तालुका प्रमुख शिवतेज सावंत,धीरज झुगरे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे अल्याणीचे उपसरपंच मनोज दळवी यांनी सांगीतले.