शिवसेना मागासवर्गीय विभाग जिल्हा प्रमुख पदी ज्योती गायकवाड
कल्याण तालुका प्रतिनिधी अविनाश कापडणे
ठाणे जिल्ह्यात दलित चळवळीत काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापिका व अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांची बाळासाहेब भवन या ठिकाणी महाराष्ठ्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे मागासवर्गीय विभागाचे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक माजी आमदार राम पंडागळे, व संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन मागासवर्गीय विभाग ठाणे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी ज्योती गायकवाड यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे दलित चळवळीत काम करणाऱ्या रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.