अखेर आदिवासी एकता परिषद-विदयार्थी परिषदेच्या आंदोलनामुळे कोसबाड कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळणार मूळकागदपत्र
महेश भोये. डहाणू प्रतिनिधी
कृषि तंत्र विद्यालय कोसबाड येथे शिक्षण घेऊन 3-4 वर्षांपूर्वी पास झालेले 45 पेक्षा जास्त विद्यार्थी , यांची मुळ कागदपत्र ही फी, शिष्यवृत्ती तत्सम कारणे सांगून रोखून ठेवली होती. त्यामुळे विध्यार्थी उत्तीर्ण होऊन मूळ कागदपत्रा (original document ) आभावी पुढील शिक्षणाच्या प्रवेशा पासून वंचित राहिले.बरेच वेळा विध्यार्थी यांनी कार्यालयात फेऱ्या मारूनही व्यवस्थापने कडून मूळ कागदपत्र (original document ) उपलब्ध करून देण्यात आली नाही. अशी तक्रार आदिवासी एकता परिषद, विध्यार्थी परिषद प्रमुख हसमुख दुबळा यांच्या कडे आली. त्यांनी व्यवस्थापने वेळोवेळी विचारणा करून ही सदर गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आदिवासी एकता परिषदेने सदर प्रकरणी गंभीर दखल घेऊन तारीख 26/06/2023 रोजी ठिय्या आंदोलन सुरु केले. शेवटी 27/06/2023 रोजी कोसबाड कृषी तंत्र विद्यायल व्यस्थापनाने यांनी सर्व विदयार्थ्यांना मुळ कागदपत्र देण्याचे मान्य केले. त्यामुळे आदिवासी एकता परिषदे च्या विध्यार्थी परिषदेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.आदिवासी एकता परिषदेच्या या आंदोलनला विविध राजकीय पक्षानी पाठिंबा दिला. पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम साहेब, (शिवसेना शिंदे गट ), जिल्हा परिषद माजी सभापती ऍड काशिनाथ चौधरी(राष्ट्रवादी काँग्रेस ), डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी (राष्ट्रवादी काँग्रेस )जिल्हा परिषद गटनेता जयेंद्र दुबळा (शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ), जिल्हा परिषद सदस्य जयवंत डोंगरकर, (भाजपा ) या अनेक मान्यवर आंदोलन दरम्यान उपस्थित होते.
आदिवासी एकता परिषद,विद्यार्थी परिषद या आंदोलनामध्ये आदिवासी एकता परिषदेचे आप. डॉ . सुनील पऱ्हाड सर , आप सुनील गुहे, आप. कैलास चौरे,आप.प्रदीप ढाक, रान उराडे,आप.उमेश ढाक, आप.संध्या धामोडे,आप. सलोनी लाखात तसेच विद्यार्थी परिषदेचे आप. हसमुख दुबळा आणि विदयार्थी आदी कार्यकर्ते सहभागी होते.