वर्ड ऑफ जीजस मिनिस्ट्री च्या वतीने नेत्र शिबिर संपन्न
श्रीरामपूर(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
,आज दिनांक २९.०६.२०२३ रोजी वर्ड ऑफ जीजस चर्च शिरसगाव या ठिकाणी नेत्र शिबिर संपन्न झाला , यामध्ये मोतीबिंदू तपासणी,प्टेरीजियम, तपासणी, चष्मा नंबर तपासणी, अल्पशा दरामध्ये चष्मा नंबर उपलब्ध , व डोळ्यामध्ये टाकण्यासाठी औषधे या कार्यक्रमाचे आयोजक वर्ड ऑफ जीजस मिनिस्ट्री चे संस्थापक अध्यक्ष पास्टर पीटर बनकर यांनी केले होते यावेळी नेत्र तज्ञ गौतम चित्ते, खरेदी-विक्री चेअरमन गणेशराव मुद्गुले, प्रभाग क्रमांक ४ भागाचे नगरसेवक प्रकाश ढोकणे ,वर्ड ऑफ जीजस मिनिस्ट्री चे उपाध्यक्ष पॉल बनकर,अन्न पुरवठा समिती सदस्य, संदीप वाघमारे, पत्रकार एजाज पठाण, टायगर ग्रुप चे अध्यक्ष बबन जाधव, संजय खाजेकर,माऊली जाधव, जावेद पठाण, कुणाल सूर्यवंशी, व महिला मंडळ उपस्थित होत्या मान्यवरांचे आभार पास्टर पीटर बनकर यांनी मानले