वैतरणा सागर बहुउद्देशीय ट्रस्ट यांच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न
( ठाणे जिल्हा प्रतिनिधी)
शहापूर तालुक्यातील वैतरणा मोडक सागर येथे वैतरणा सागर बहुउद्देशीय ट्रस्ट यांच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रम संपन्न झाला . ' एक झाड अनेक श्वास ' या ब्रीदवाक्य नुसार आचरण करत मागील तीन वर्षापासून वैतरणा मोडक सागर परिसरामध्ये ट्रस्टच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात येतो . वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी रोखण्यासाठी एक छोटेसे पाऊल या ट्रस्ट कडून उचलले गेले आहे . दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वैतरणा मोडक सागर या क्षेत्रात ट्रस्टच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात येते व त्याच्या संगोपन होईल या दृष्टीने ट्रस्ट नेहमी कार्यरत असते . वैतरणा मोडक सागर धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो . शहापूर तालुक्यामध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणारे तीन धरण आहेत . या दृष्टिकोनातून शहापूर तालुक्यात पाऊस पडणे हि मुंबईसाठी गरज आहे . ज्यांनी वैतरणा मोडक सागर येथे आपले बालपण जगले ते सर्व तरुन एकत्र होतात व एक चांगल्या कार्यासाठी स्वतःला झोकून देतात . यातूनच पुढे वैतरणा सागर बहुउद्देशीय ट्रस्ट ची स्थापना होते . या ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात . त्यातीलच एक उपक्रम म्हणजे दरवर्षी करण्यात येणारी वृक्ष लागवड होय .
या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सतीश बोर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी 130 कोटी झाडे दरवर्षी भारतामध्ये लागली जातील यातील जगतील किती याकडे लक्ष देण्याची गरज नाही . जंगलामध्ये पशु प्राणी राहत असतात . यातील काही पशु हे चारा म्हणून झाडाचा पाला खातात तो त्यांचा हक्क आहे . हि एक अन्नसाखळी आहे . त्या अन्नावर त्यांचा अधिकार आहे . त्यांनी जरी काही झाडे खाल्ली तरी त्यातून काही फरक पडत नाही 130 कोटी झाडांपैकी दरवर्षी निम्मे झाडे जरी जगली तरी भारत निसर्गदृष्ट्या सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही . मानवाने आपले काम प्रामाणिकपणे केले तर निसर्ग आपल्याला भरभरून देणारे आहेच यात कोणतेच दुमत नाही .
यावर्षी ट्रस्टच्या वतीने बिजारोपण करून झाडे तयार करण्यात आली . ही झाडे मोडक सागर येथील बीएमसीच्या कंपाउंडमध्ये तयार करण्यात आली . यावेळी बीएमसीतील कर्मचारी नितीन खरात , समाधान पगारे , आनंद जाधव व भूषण जाधव यांनी झाडे पाणी टाकून जगवण्यासाठी विशेष मेहनत घेतली .
वनाधिकारी प्रकाश चौधरी , गोसावी , भोईर यांचे देखील नेहमी या कामी ट्रस्टला सहकार्य लाभते .
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सतीश बोर्डे ( संस्थापक अध्यक्ष ) , संतोष घरत ( सहखजिनदार ) , रविकांत जाधव ( उपाध्यक्ष प्रचार प्रसार विभाग ) , पांडुरंग किरकिरे ( सभासद ) , नरेंद्र वैराळ ( लेखन प्रचार प्रसार विभाग) , स्वप्निल वेदक ( सिनियर आयटी इंजिनिअर ) , पापा भाई शेख ( खजिनदार ) , अबा साळुंखे ( वरिष्ठ सभासद ) , केरप्पा सुर्वे ( वरिष्ठ सभासद ) , जगन पंडित ( वरिष्ठ सभासद ) , श्याम घायवट ( वरिष्ठ सभासद ) , प्रज्वल जाधव ( सांस्कृतिक विभाग ) , उमाकांत आव्हाड ( वन अधिकारी शहापूर ) , संजय खडपे ( सल्लागार वरिष्ठ सभासद ) , हुसैन मुलानी ( वरिष्ठ सभासद ) , गणपत आर्य ( सभासद )यांनी विशेष मेहनत घेतली .