Breaking News
recent

मणीपूरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला अटक

 


पुणे: कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या मणिपूर येथील एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणास अटक केलीयाबाबत अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्ताफ नाझीर खान (वय २१, रा. मालविल मशिदीजवळ, कोंढवा खुर्द) याला अटक करण्यात आलीी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी एक महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आली होती. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या तीन बहिणी भाडेतत्वावर खोली घेऊन कोंढवा भागातील एका इमारतीत राहायला आहेत.

मुलगी रात्री इमारतीच्या जिन्यातून निघाली होती. त्यावेळी आरोपी खानने तिला धक्का मारला. मुलीचा तोल गेला. खानने अल्पवयीन मुलीला सावरण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी अश्लील कृत्य केले. मुलीने आरडाओरडा केला. तेव्हा तिची बहीण खोलीतून बाहेर आली. खान तेथून पसार झाला. पसार झालेल्या खानला पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

Powered by Blogger.