महंत जितेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली खरडुन गेलेल्या पुलावर दगड,माती टाकुन पुल दुरूस्तीसाठी पुढाकार…...
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
दि.22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टी मुळे सततधार पाऊस कोसळल्यामुळे वाईगौळ,पोहरादेवी ते धानोरा रस्त्यावरील दोन्ही मुख्य पुल पाण्यामध्ये खरडुन गेल्यानंतर दोन्ही पुलाला मोठे खड्डे पडले होते,दोन दिवसांपासुन वाईगौळ,पोहरादेवु,ऊमरी व धानोरा प्रवास करणाऱ्या लोकांना आतोणात त्रास होत होते,गाडी घेऊन नाल्यात पडत होते,तरीपण दोन दिवस ओलांडले तरी सार्वजनीक बांधकाम विभाग,मानोरा यांनी कोनतीही त्या पुलासंदर्भात कार्यवाही केली नाही.
पुलाला दिडफुट खोल खड्डे पडल्यामुळे लोकांना आतोनात त्रास होत असल्याने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथाण कारभाराला कंटाळुन स्वतः महंत जितेंद्रजी महाराज व वसंतनगर पोहरादेवीचे सरपंच व पोहरादेवी व वसंतनगरच्या शेकडो मुलांनी स्वतः आपल्या हाताने त्या खड्यामध्ये गोटे,मुरूम ठाकुन तो रस्ता पुर्वरत केला व सगळ्या रहदारी करीता झालेली अडचन दुर केली,याप्रसंगी श्री.गणेश जाधव(सरपंच वसंतनगर),अमीत महाराज,किसन जाधव,अर्जुन पंडित,शुभम राठोड,अनीकेत राठोड मनोज चव्हान, मोती चव्हान सह शेकडो पोहरादेवी व वसंतनगरचे युवक महाराजांच्या कार्यात हजर होते.