Breaking News
recent

राजूर घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना ३१ जुलै पर्यंत ‘एमसीआर’



बुलढाणा: बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटातील गंभीर व बहुचर्चित प्रकरणातील ७ आरोपींना मोताळा न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राजुर घाटातील कथीत सामूहिक बलात्कार प्रकरण आधी गंभीर घटना व नंतर संबंधित महिलेच्या ‘यु टर्न’ मुळे राज्यभर गाजले. सदर प्रकरणात पिडीत महिलेने अत्याचार झालाच नसल्याचा जबाब दिल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. दरम्यान प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ७ आरोपींना न्यायालयाने १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. १८ जुलै रोजी त्यांना मोताळा येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

महिला नातेवाईकासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी गेलेल्या पुरुषासह महिलेस ७ जणांनी मारहाण करून त्यांच्या जवळील ४५ हजार रुपये लुटले होते. पुरुषाने १३ जुलै रोजी बोराखेडी पोलिसांत लुटमार व सोबतच्या महिलेवर सामहिक लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र १४ जुलै रोजी उपरोक्त महिलेने आपल्यावर लैंगिक अत्याचार झालाच नसल्याचा जबाब पोलिसांसमोर दिला होता.तसेच विद्यमान न्यायालयासमोरही बयान दिले. पोलिसांनी पाच आरोपींसह दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले होते. त्यांची स्थानिय शासकीय बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती.


Powered by Blogger.