राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी मो. युसूफ पुंजानी यांची नियुक्ती
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटणारे तसेच सामाजिक कार्यातून लोकप्रिय झालेले मो. युसूफ पुंजानी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे आदेशाने पक्षाच्या वाशीम जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मो. युसूफ पुंजानी हे २०१० पासून राजकारणात सक्रिय झाले त्यांनी २०११ मध्ये नगर पालिकेची निवडणूक लढवून विजय प्राप्त केला. व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते पदी विराजमान झाले. नंतर त्यांनी २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविली यात त्यांनी जिकरीचे झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली
तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. कारंजा नगर परिषद व मानोरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. त्यांनी अल्पावधीत पक्षासाठी केलेले कार्य पाहता उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीने पुंजानी यांची पक्षाच्या वाशीम जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व रांका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. अमोल मिटकरी, कारंजा न.प चे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर, अमरावती जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीमती सोनलीताई ठाकूर, व्यापारी असोसिएशनचे वाशिम अध्यक्ष गोविंद वर्मा,माजी जि.प अध्यक्ष दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
अजितदादांनी माझ्या वर टाकलेला विश्वास व जिल्हाध्यक्ष पद देऊन काम करण्याची दिलेली संधी गोर गरिबांचा सेवेत आपण अर्पण करू मिळालेल्या पदाचा उपयोग सर्व सामान्यांच्या समस्यांचे निराकरण व पक्षाच्या विचारसरणीला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करिन तसेच आपण जिल्हाध्यक्ष पदावरून पक्षला बळकट करून संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विस्तार करेल.-- मो.युसुफ पुंजानी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाशीम