डहाणूमध्ये आदिवासी महिलेवर तब्बल तिन वर्षे केला बलात्कार , चिकू तोड कामगार महिलेचा आरोप !
डहाणू प्रतिनीधी - महेश भोये.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात धक्का दायक प्रकार उघडकीस आला असुन आदिवासी महिलेच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. सदर पीडित महिला आदिवासी जमातीची असून ती तब्बल सात वर्षापासून चिकूच्या वाडीत काम करत होती . वाडीत काम करत असताना चिकुवाडी मालक - खोदादाद मिनू इराणी यांच्या घरी घरकाम (साफसफाई ) करण्याचे काम करत होती. सदर पीडित महिला खोदादाद मिनू इराणी यांच्या घरी घराची साफसफाई करत असताना पीडित महिलेच्या घरमालक खोदादाद मिनू इराणी यांनी पाठीमागून मिट्ठी मारून जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला व याबाबत इतर कोन्हास सांगितले तर तुला व तुझ्या संपूर्ण कुटंबाला मारून टाकेन अशी दमदाटी करत महीलेला जिवेमारण्याची धमकी देऊन सतत तिन वर्षे अन्याय अत्याचार करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एका बाजूला मणिपूर राज्यात आदिवासी दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली जाते हे प्रकरण जगभर गाजत असताना इकडे पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील आदिवासी महीले वर सतत तीन वर्षे बलात्कार केला जातो यावरून असे चित्र स्पष्ट होत आहे की भारत देशात आता महिला असुरक्षित आहेत व ज्या देशात महिलांचा आदर केला जात होता तो मान आता कुठेतरी कमी झाल्याचं दिसते आहे . त्यामुळे देशात अशा शर्मनाक घटना घडत असल्याने सर्व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पाठोपाठ आता डहाणू मधील ही घटना समोर आली आहे. सदर पीडित महिलेने या गोष्टीला त्रासून , कंटाळून शेवटी आपले कठोर मन करून डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . त्या तक्रारीची दखल घेत डहाणू पोलिसांनी आरोपी खोदादाद मिनू इराणी याच्यावर योग्य ती पोलिस कारवाई करून गुन्हा नोंदवला आहे . मात्र एक खेदाची बाब अशी आहे की गुन्हा नोंदवला असुन आरोपी मात्र अटक होण्याआधीच फरार असल्याचे पोलिसांकडून समजले आहे. या आरोपीचा शोध चालू असून त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल असे डहाणू पोलिस ठाणे व डहाणू DYSP संजीव पिंपळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
चिकूच्या वाडीत काम करत असताना घरात साफसफाई करण्यासाठी घरी बोलवायचे त्यावेळेस दिनांक.20/02/2021ते 17/05/2023 पर्यंत खोदादाद मिनू इराणी यानी माझ्यावर बलात्कार केला. मला व माझ्या कुटंबला जिवेमारण्याची धमकी देत होता. माझा परीवार आहे. माझी समाजात बदनामी होईल या भीतीने मी शांत राहिली. आता मी 22/07/2023 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी खोदादाद मिनू इराणी लवकरात लवकर पोलिसांनी शोधावे व त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी माझी पोलिसांना मागणी विनंती आहे. -- पिडीत महिला
पिडित माहीला आमच्याकडे तक्रार घेऊन आली असता आम्ही महिलेला व तिच्या नवऱ्याला घेऊन डहाणू पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे .डहाणू जवळील बऱ्याच महिला डहाणू मध्ये चिकुच्या वाडीत काम करीत आहेत. असा अन्याय दुसऱ्या आदिवासी महिलांवर ही होत असावा असा संशय व्यक्त करत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. अशी इच्छा व्यक्त केली आहे .-चंद्रकांत गोरखणा (CPM कार्यकर्ता)
आरोपी खोदादाद मिनू इराणी या इसमावर भा . द. वि. स. नुसार कलम 376 , 376(2)(n) , 342 , 504 , 3(1)(w)(I) , 3(1)(w)(II) , 3(2)(va) दाखल केले आहेत. सदर आरोपी फरार असून शोध चालू आहे. त्या करिता दोन पथके तैनात करण्यात आली असून शोध चालू आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करू व त्याच्यावर पुढील योग्य ती कारवाई करून पीडित महिलेला न्याय देऊ .- श्री. संजीव पिंपळे (उपविभागीय पोलिस अधिकारी डहाणू विभाग)