Breaking News
recent

पुरामुळे शेंदोना गावाचा पुल गेला वाहुन.....



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी सर्कल मधील शेंदोना परिसरात दिनांक 22/7/2023 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेंदोना गावाचा सपंर्क तुटला,,,, सविस्तर वृत्त असे की शेंदोना हे गाव वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेला आहे सदर गावात बंजारा व आदिवासी समाज बांधव गुण्यागोविंदाने राहतात आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरवर्ग उमरी पोहरादेवि येथे काम करावयास जातात,पण निसर्गाच्या प्रकोपामुळे रहदारी साठी एकच असलेला पुल हा वाहुन गेल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे,तरी प्रशासनाने या बाबींकडे लक्ष मागणी केंद्रित करून रहदारी साठी पुल मोकळा करून देण्याची मागणी स्थानिक शिव शिवसैनिकानी केली आहे    

दि २२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने पुराचे पाणी गावात घुसले व अनेक घरं उद्ध्वस्त केले तसेच घरातील कपडे लत्ते, अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले आणि काही जनावरे मृत्युमुखी पडले. शेकडो घरे पाण्याखाली गेल्याने घरं जमिनदोस्त झाल्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहे. या विषयी शिवसेना संपर्कप्रमुख भोलाभाऊ राठोड यांनी तहसीलदार साहेब यांच्यासोबत फोनवर चर्चा केली व सर्कल ची पाहणी करायला सांगितले तरी प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देण्याची मागणी शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे व भोलाभाऊ राठोड मीत्र मंडळाचे शिवसैनिक श्रीकांत राठोड यांनी वृत्तपत्राद्वारे प्रशासनाकडे केली आहे,,,,,


Powered by Blogger.