Breaking News
recent

जिल्हया वर कोसळले अस्मानी संकट



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड 

मानोरा तालुक्यातील वाईगौळ याभागात २० तारखे पासून सतत पाऊस पडत आहे या मुळे येतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील काही दिवसा पासून सतत पावसाचा धडका सुरू आहे. आज २२ जुलै रोजी ढंग फूटी सदरुस्त परीस्थिति निर्माण झाली आहे आहे त्यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी साचल्याने पिके संकटात सापडली आहे या भागात घरात पानी साचलेले आहे येथील लोकाना पाण्यात राहावे लागत आहे या भागात मुसळधार पाणी व हवा या संकटाचा सामना बळीराजा कारीतच असतो मात्र शनिवारी शेत मालकावर हे अस्मानी संकट कोपले गेले 

तालुक्यात आठवढयाभरा पासून पावसाची सतत धार सुरू आहे हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत ठरला आहे आज रेड अलट्र् वर्तवण्यात आले असून या भागात परीस्थिति गंभीर स्वरूपाची झाली आहे शेत शिवारात पाणीच पाणी असल्या मुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे पीकचे नुकसान झाले आहे तालुक्यात सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु असून नदी,नाल्याला पूर आले आहे.वाईगौळ गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले, गाव जलमय झाले असून गावाला नदीचे स्वरूप आले आहे.या परीस्थिति कडे शासनाने लक्ष देण्याची गरजचे  आहे.  पुढील काही दिवस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्याने वरील नमूद ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यात सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Powered by Blogger.