भीमराव पाटील जिनिंग फॅक्टरीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध
अध्यक्ष पदी अभिजित पाटील तर उपाध्यक्ष पदी गोपाल लढा यांची अविरोध निवड
मानोरा प्रतिनिधी --- बाबुसींग राठोड
मानोरा :--- येथील भीमराव पाटील जिनींग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया २७ जून ला पार पडली यावेळी अध्यक्ष पदाकरिता अभिजित विठ्ठलराव पाटील तर उपाध्यक्ष पदाकरिता गोपाल नारायणदास लढा यांचे एक मेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर. बांते यांनी अध्यक्षपदी अभिजित पाटील व उपाध्यक्ष पदी गोपाल लढा यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा होताच समर्थकानी गुलालाची उधण करीत पेडे वाटून एकच जल्लोष केला.
भीमराव पाटील जिनींग आणि प्रेसिंग सहकारी संस्थेची संचालक पदाची निवडणूक अविरोध पार पडली त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी ए. आर. बांते यांनी २७ जून ला लावला यावेळी अध्यक्ष पदाकरिता अभिजित विठ्ठलराव पाटील तर उपाध्यक्ष पदाकरिता गोपाल नारायणदास लढा यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यक्ष पदाकरिता अभिजित पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी गोपाल लढा अविरोध निवडून आल्याची घोषणा बांते यांनी करताच पाटील समर्थक यांनी गुलाल उधळत पेडे वाटून एकच जल्लोष केला यावेळी सर्व आठरा पैकी सतरा संचालक हजर होते.