Breaking News
recent

ग्राम पंचायतचा कृती आराखडा तिर्थक्षेत्र विकास आराखड्या मध्ये समावेश करण्या बाबत निवेदन



मानोरा प्रतिनिधी (वाशिम) :--- बाबुसींग राठोड

मानोरा :---- माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी २९ जून ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोहरादेवी ग्राम पंचायत कृती आराखड्याचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करून गावाचा विकास करण्यात यावे असे निवेदन पाटील यांनी फडणवीस यांना देण्यात आले.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या निवासस्थानी माजी. आ.अनंतकुमार पाटील यांनी  श्रीक्षेत्र पोहरादेवी ग्राम पंचायत कृती आराखडा उपमुख्यमंत्री यांना दिला  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हा कृती  आराखडा तिर्थक्षेत्र विकास आराखड्या मध्ये समावेश करण्यात यावे म्हणून निवेदन दिले यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी  पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास  आराखड्याची कमिटी करण्याचे कबुल केले व त्या कमिटी मध्ये वाशिम जिल्हा पालकमंत्री व कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी व ग्रामपंचायत पोहरादेवी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महिला सदस्य व गावातील काही प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश असणारी  कमिटी तयार करण्याचे उपमुख्यमंत्री   फडणवीस यांनी कबुल केले पोहरादेवी ग्रामपंचायत कृती आराखड्यामधील कामे खालील स्वरूपात आहे.

राज्य महामार्ग पोहरादेवी ते सिंगद दुहेरी रस्ता बनविणे, राष्ट्रीय महामार्ग पोहरादेवी ते वाईगौळ सिमेंट काँक्रेट रस्ता व दुतर्फा नाली व रुंदीकरण व सर्व पुलासह, पोहरादेवी ते पंचांळा फाटा सिमेंट काँक्रेट रस्ता व दुतर्फा नाली व रुंदीकरण सर्व पुलासह,हनुमान मंदिरवर भव्य सभामंडप,जुनी ग्रामपंचायत भवन पाडुन नविन इमारत बांधुन त्यामध्ये खाली शॉपिंग कॉम्प्लेक्स वर ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय निर्माण करणे, उपजिल्हा रुग्णालय त्या मध्ये ३५ खाटांची प्रशस्त इमारत. इसिजी सुविधा एक्स-रे मशीन ऑक्सीजन मशीन व रक्त निदान उपकरणे,स्वतंत्र गावठाण फिडर निर्माण करणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तिर्थक्षेत्र पर्यटन पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकभक्तांना एस.टी. महामंडळामार्फत विदर्भाकडे ये-जा करणाऱ्या सर्व बस फेऱ्या  तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथून सुरु करणे,पोहरादेवी येथे येणाऱ्या एस.टी. चालक व वाहक यांना विश्राम गृह , पाणी व्यवस्था, बसस्थानकाला वाहक निरीक्षक देण्यात यावे, शासकीय विश्रामगृह बनविणे,नवीन पोलिस स्टेशनची निर्मिती करणे,

जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणे, पोहरादेवी परिसरात विद्युत रोशनी, पोहरादेवी येथे रेल्वे महामार्ग  करणे, केंद्रीय दुरसंचार विभागाचे मोठे कार्यालय व मोठे टाॅवर उभारणे, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडणे,डाक विभागाचे कार्यालय इमारत बांधकाम करण्यात यावे.,जल व्यवस्थापन,घन कचरा व्यवस्थापन, क्रिडा संकुल, महिला भवन व गावातील अंतर्गत रस्ते नाल्या व सौंदर्यकरण करण्याबाबत या आराखड्या मध्ये समावेश करण्यात आले असून यावेळी आ गोपीचंद पडवळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील हे उपस्थित होते.


Powered by Blogger.