संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिन शहापूर येथे संपन्न.
सालाबादाप्रमाणे संत शिरोमणी नामदेव महाराज, यांचा सहाशे त्र्याहत्तर वा, संजीवन समाधी सोहळा दिन, रविवारी शहापूर येथील, आगरी समाज हाॅल येथे, शिंपी समाज बांधवांनी, मोठ्या उत्साहाने साजरा केला. सुरवातीला विजय बोरसे, गोकुळ कापडणे, नरेंद्र भामरे, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, हभप शिवाचार्य शिवभक्त, पुंडलिक पांडुरंग पाटील महाराज, यांच्या हस्ते द्विपप्रज्वलन आणि नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. हभप पाटील महाराज यांनी, नामदेव महाराज, तसेच नामदेव महाराज यांच्या कार्याची महती, विस्ताराने कथन करीत, उद्बोधक भाषण करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वारकरी धर्माची स्थापना ज्यांनी केली, त्यांची नावे अनेक किर्तनकारांकडुन, किर्तन करतांना घेतले जात नाही, देव, धर्म समाज सुधारक हे, जातीपाती मधे वाटले गेले आहेत, अशी खंत पाटील महाराज यांनी व्यक्त केली.
या नंतर जेष्ठ समाज बांधव बोरसे सर, कापडणे गुरूजी, भामरे सर, यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांचा लिंबु चमचा स्पर्धा - , जोडप्यांनी फुगा फुगवून फोडणे,संगीत खुर्ची आदी मनोरंजक खेळ खेळले गेले. त्यानंतर या शैक्षणिक वर्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीना सन्मान पत्र, विविध बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी नरेंद्र भामरे, कापडणे, चव्हाण, बोरसे, बागुल, जगताप आदी सहकुटुंब सह परिवार कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधे विजयी झालेल्या बाविस्कर मॅडम, प्रतिक बोरसे, योगिता बिरारी, गणेश व सौ. गितांजली बाविस्कर आदि विजेत्यांचा बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला. जेष्ठ समाज बांधव नरेंद्र भामरे यांनी चहा, जेवणाचा खर्च उचलला, तर कै. अमृत गंगाराम बागुल यांच्या स्मरणार्थ त्यांची कुटुंबियांना प्रत्येक सहभागी कुटुंबाला स्मृती चिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरारी सर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत बोरसे, अविनाश कापडणे, नितीन बिरारी यांनी परिश्रम घेतले. तर सुनील जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.