Breaking News
recent

कासा पोलिसांना तोतया पोलिसाला जेरबंद करण्यात यश

 


५०० रू. नोटा ऐवजी १०० रू. नोटा डबल करून देण्याची हेराफेरी

डहाणू प्रतिनिधि : महेश भोये

पालघर - डहाणू 22 जुलै : पोलिस असल्याचे सांगून चक्क या तोतया पोलिसाने मित्रलाच लावला हेराफेरीचा चुना. 500 रू. नोटांच्या बदल्यात 100 रू. दोनपट किमतीच्या नोटा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला कासा पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तोतया पोलिसाला अटक करण्यात मोठ यश आले आहे. या तोतया पोलिसाचे नाव प्रवीण मधुकर वड अस असून तो पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली  ( चौधरीपाडा ) येथील रहिवासी आहे.

      तर फसवणूक झालेला इसम हा तलासरी तालुक्यातील शनवारपाडा येथील असून त्याचे नाव महेश रायात आहे. फिर्यादी महेश रायात यांनी पोलिसांना या संदर्भात कासा पोलिसांना फिर्याद दिल्याने पोलिसांनी त्वरित सापळा रचून आरोपीला विक्रमगड मधील त्याच्या राहत्या घरी अटक करण्यात आली. आरोपी मधुकर वड या तोतया पोलिसाने फिर्यादी महेश यांना सांगितले की तुझ्याकडे रुपये 500 च्या नोटा एकूण 1 लाख रुपये असतील तर घेऊन ये , त्या 500 रू. 1 लाख रु . बदली तुम्हाला दोनपट प्रमाणे 100 रू. च्या नोटा भेटतील अस सांगून फसवणूक करून फिर्यादीला मुंबई अहमदाबाद महामार्ग चारोटी  पुलाच्या खाली पैसे घेऊन बोलवण्यात आले. त्यानंतर युनिकॉर्न बाईकवर आलेल्या दोंघाच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांची दोन बंडल म्हणजे तब्बल लाख रुपये आरोपी प्रवीण मधुकर वड याने ठेवण्यास सांगितले.

    फिर्यादी महेश यांनी 500 रू. च्या नोटा बॅगेत ठेवताच बाईकवरून आलेल्या दोन्ही आरोपीच्या मदतीने घटनास्थळावरुन पलायन केले. त्यानंतर फिर्यादी महेशला आपली फसवणूक झाल्याचं कळताच त्याने कासा पोलिस ठाण्यात धाव घेतली व फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी मोटारसायकल नंबर वरून व फिर्यादी दिलेल्या नाव , पत्ता आधारे कासा पोलिसांनी सूत्र हालवत विक्रमगड येथून आरोपी तोतया पोलिस याला अटक करण्यात यश आले. आरोपी तोतया पोलिस प्रवीण मधुकर वड यांच्यासह त्याचे अजून तीन साथीदार आरोपी यांना पकडण्यात यश आले आहे. आरोपींना पकडून लंपास केलेली रक्कम रुपये 1 लाख रु. फिर्यादी महेश रायात याला परत मिळवून दिली. त्यामुळे कासा पोलिसांचे फिर्यादी महेश रायात व त्यांच्या कुटुंबाने मनपूर्वक आभार मानले.

       या प्रकरणी कासा पोलिस ठाण्यात भा. द. वी. 420 , 170 , 34 नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसच अशा आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये , असं आवाहन पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी केलं आहे.

Powered by Blogger.