विविध मागण्यासाठी ना.संजयभाऊ राठोड साहेब पालकमंत्री यांना निवेदन
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी पावसामुळे गावातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान भरपाई व सरसकट विमा मिळण्या बाबत व संत सेवालाल महाराज मंदिर संघर्ष नगर चांदिवली घाटकोपर येथे बिल्डर दादागिरी करून कब्जा करण्या बाबत.
सविस्तर असे की, मागील दोन-चार दिवसापासून होणाऱ्या अति पावसामुळे व तसेच ढगफुटी अतिवृष्टीमुळे नदी नाल्याला अतीपुर आल्याने मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे हजारो नागरिकांचे घराचे भिंती पडल्या असून घरातील शेती उपयोगी साधन व अन्न वस्त्र निवारा पूर्णपणे नुकसान झाले असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे नाल्यांच्या आणि नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतीमधील सर्व पिके खरडुन गेले त्याचबरोबर विहिरी सुद्धा जमीन दोस्त झाले असून शेतातील शेती उपयोगी साहित्य पुरामुळे वाहून गेलेत असे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या शेतीचा लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई व तसेच विमा देण्यात यावी करिता निवेदनात मागणी करण्यात आली .
दिनांक 25 /7/2023 रोजी संत सेवालाल महाराज मंदिर संत सेवालाल महाराज मंदिर चांदीवली येथील पुजारी श्री पांडुरंग महाराज यांची भेट झाली असता आम्ही बंजारा सिस्टमंडळाचे सर्व सदस्य यांना त्यांनी सांगितलं की परत अजून राहुल शहा बिल्डर अजून परत आम्हाला त्रास देत आहे संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवीचे मंदिर पाडतो म्हणून धमकी देत आहे.
मंदिरासमोरील सर्व जागेवरती कब्जा करतो म्हणून सांगत आहे आणि या जागेवर बिल्डिंग डेव्हलप करतो म्हणून धमकी देत आहे तुमचा कोणी आला तरी यावेळेस पुरी ताकतीने मंदिर पाडून या जागेवरती बिल्डिंग बांधतो असं सतत धमकी देतोय ह्या कारणामुळे आम्ही बंजारा समाजाचे शिष्टमंडळ पुजारी पांडुरंग महाराज, श्री डी डी नायक सामाजिक कार्यकर्ते, श्री वसंतराव राठोड राज्य संघटक राष्ट्रीय बंजारा परिषद , श्री शाम राठोड जिल्हा समन्वयक युवासेना वाशिम व इतर समाजाचे कार्यकर्ते मिळून आम्ही माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांची भेट घेऊन त्यांना संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरा च्या समस्या विषयी सविस्तर माहिती समजून सांगितली असता आदरणीय भाऊंनी तात्काळ संबंधित बिल्डरांना फोन लावून लवकरच मीटिंग बोलवण्यासाठी त्यांना सांगितली आणि मंदिराची समस्या कायमची सुटण्यासाठी बंजारा समाजाचे कार्यकर्ते घेऊन ह्या मीटिंगमध्ये आदरणीय भाऊ व त्यांचे शिष्टमंडळ तसेच तेथील आमदार दिलीप लांडे मामा आणि मंदिराचे पुजारी , श्री डीडी नाईक, श्री वसंतराव राठोड, श्री देविदास चव्हाण व इतर कार्यकर्त्यांना घेऊन मंदिराच्या विकास करण्याकरिता आणि तेथे ग्रंथालय गावाकडून येणाऱ्या लोकांसाठी राहायची व्यवस्था शिक्षणाची सोय सुविधा आपण मिळून करूया व अतिवृष्टी नुकसान भरपाई व सरसकट विमा या बाबत योग्य निर्णय घेतला जाईल असी भाऊंनी गव्हाई दिली