Breaking News
recent

सर्वसमावेसक पीक विमा योजनेत शेतकऱ्यानी सहभागी व्हावे.-अनिल राठोड शिवसेना(उबाठा )



मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

प्रधानमंत्री पीक विमा आपल्या राज्यात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनाक 26 जून 2023 रोजी नुसार राज्यात सर्वसमावेसक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णया नुसार राज्यातील शेतकऱ्याना प्रती अर्ज १/ रुपया भरून पीक विमा नोंदणी करता येणार आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याना ईचीक आहे. सन २०२३-२४ या चालू खरीप हंगामात राज्यातील शेतकाऱ्यासाठी प्रति अर्ज १/ रुपया भरून पीक विमा भरण्याची सर्वसमावेसक योजना राज्यात शासनाने सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कारंजा मानोरा मतदारसंघाचे लोकप्रिय  नेते अनिल  राठोड  शिवसेना(उबाठा) तथा मा. विज मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.   

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकाऱ्यासाठी आधार कार्ड,पीक पेरा अहवाल, ७/१२, ८ अ ,बँक पासबूक ,मोबाइल क्रमांक इत्यादी दस्तावेजची आवश्यक आहे. या योजनेत पुढील बाबीचा समावेश करण्यात आले आहे हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किवा लावणी न झाल्यास होणारे नुकसान पीक पेरणीपासून काढणी पर्यन्तच्या कालावधीत नसर्गिक ,आग ,वीज कोसळणे ,गारपीठ ,चकरी वादळ ,पूर परिस्थिती,क्षेत्र जलमय होणे ,दुष्काळ, पावसातील खंड ,कीड व रोग ,इत्यादी बाबीमुळे हंगामाच्या शेवटी येणारी घट ,स्थानिक नैसर्गिक कारणामुळे होणारे उतपणात आपतीमुळे पिकाचे होणारे काडणी पश्चयत १४ दिवसापर्यंत नुकसान या बाबीचा समावेश आहे. या योजनेतील समविस्त पिके या प्रमाणे आहेत पीक वर्गवारी पाऊसमुळे सोयाबीन ,कापूस  यासारख्या पिकाची तुणधान्य वकडधान्य पिके यात खरीप हंगामातील भात,खरीप ज्वारी ,बांजरी ,नाचणी ,मुंग,उडीद,तूर ,मका ,या आठ पिकाचा समावेश आहे. नगदी पिकामद्धे खरीप हंगामातील कापूस,खरीप कांदा या पिकांचा समावेश आहे.  

  महसूल मंडळ मध्ये मांनकांपेक्षा कमी विहित पेरणी झाल्यास शेतकाऱ्याना विना पेरणीसाठी विमा संरक्षण लाभणार आहे. शेतकऱ्यानी प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी शेवची दिनाक ३१/०७ /२०२३ आहे तरी शेतकऱ्यानी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. शेवटच्या तारखेला संकेतस्थळ तान चालणार नाही. अशा कारणामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकऱ्यानी त्वरित पीक विमा भरण्याची कार्यवाही करावी.असे आवाहन अनिल  राठोड  शिवसेना(उबाठा) तथा  विज मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

Powered by Blogger.