सुपर एक्सप्रेस हायवे भूसंपादन मोबदला न दिल्याने तलासरी मध्ये जमीन मालक संतप्त!
डहाणू प्रतिनिधी : महेश भोये.
सध्या पालघर जिल्ह्यात केंद्र शासनाचे दोन मोठे प्रकल्प सुरू आहेत . मात्र त्या प्रकल्पात भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने काही ठिकाणी वाद पेटला होता. त्यातच आता एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तलासरी मधील कोचाई बोरमाळ येथे केंद्र सरकारच्या वतीने सुपर एक्सप्रेस हायवेचे काम जलद गतीने सुरू आहे. मात्र त्या कामात भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अथवा जमीन मालकांना त्या संदर्भात मोबदला न दिल्याने आता तेथील जमीन मालक संतप्त झाले आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार सदर जमिंनमालकाना भूसंपादनाचा मोबदला न देताच प्रांत अधिकारी व कलेक्टर यांच्या पाठिंबाने ठेकेदार जोरजबरदस्तीने काम सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे असाच वाद मागील डहाणू तालुक्यातील धानोरी गावात घडला होता. आणि तो वाद टोकाला जाऊन आदिवासी शेतकरी जमीन मालकांना अन्याया विरुध्य लढावं लागल होत. त्यामध्ये काही कुटुंब हे बेघर होऊन रस्त्यावर आले होते. त्या वेळेस पालघर जिल्ह्यातील सर्व स्थानिक विधानसभा आमदार एकत्र येऊन त्यांनी या संदर्भात लढा दिला होता व त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न केले होते. त्यामध्ये डहाणू विधानसभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांचा मोलाचा वाटा होता. त्याच प्रमाणे आजही सदैव कर्तव्य दक्ष व आदिवासी गोरगरीब लोकांच्या न्यायासाठी लढणारे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले आज दि. ११/७/२०२३ रोजी या ठिकाणी स्वतः गेले असता हा प्रकार लक्षात आल्याचे समजले आहे. त्यावेळी त्यांनी शेतकरी सवांद साधला त्यांची समजूत काढली .त्यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व संघटनेचे चंद्रकांत घोरखणा(किसानसभा कर्याध्यक्ष) , तर लक्ष्मण डोंबरे (तालुका सेक्रेटरी), नंदकुमार हाडळ(उपसभापती), शरद उंबरसाडा , नरेश शिंगडा , कमलेश राबड व बाधित शेतकरी उपस्थित होते. तेंव्हा तेथील भुसंपादित जमीन मालकाने आमदार विनोद निकोले यांना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. त्यावेळी त्या शेतकरी जमीन मालकाने सांगितले की आम्हाला आमच्या भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला न देताच प्रांत अधिकारी व कलेक्टर यांच्या जोर जबरदस्तीने हे काम सुरू करण्याचे चालू आहे. त्यामुळे ठेकेदार गोरगरीब जमिन मालकाना फटकारुन जबरदस्तीने काम करत असल्याचे समजले आहे.
या संदर्भात विनोद निकोले यांनी शेतकरी जमीन मालकांना मार्गदर्शन करीत त्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले. व धानोरी सारखा वाद न पेटावा याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले. शक्यता सरकारने याकडे विशेष लक्ष घालावे जेणेकरून भूसंपादन झालेले बाधित शेतकरी यांनी आक्रमक भूमिका न घेता व एक नवीन वाद निर्माण न होन्याकडे लक्ष घालावे व त्यांना योग्य तो मोबदला देण्यास सहकार्य करावे. अशी भूमिका डहाणू आमदार विनोद निकोले यांनी स्पष्ट केली.