शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक ७ मध्ये जलशुद्धीकरण केंद्र होणार !
कल्याण प्रतिनिधी अविनाश कापडणे
नगरपंचायत प्रभाग क्र. ७ मध्ये ९ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसणार.
शहापूर नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या कोट्यातुन नगरविकास विभागाकडुन प्रभाग क्रमांक ७ मध्ये नवीन ९ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३ कोटी ५० लक्ष रूपये मंजूर करण्यात नगरसेवक हरेश रघुनाथ पष्टे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
केंद्रीय मंत्री तथा भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे शहापूर नगरपंचायत मधील भाजपा नगरसेवक यांनी प्रभाग क्रमांक ७ मध्ये नवीन ९ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३ कोटी ५० लक्ष रूपये मंजूर करण्यासाठी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी नगरविकास विभागाकडून पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या प्रभागातील नगरसेवक हरेश रघुनाथ पष्टे यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक ७ मध्ये नवीन पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी ३ कोटी ५० लक्ष रूपये मंजूर करण्यात यश आले.यासाठी त्यांनी वेळोवेळी मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता.सदर कामाची प्रशासकीय मान्यता नगरविकास विभागाकडुन देण्यात आली असून त्यावर प्रस्ताव नगरपंचायत मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला होता.त्यावर ४ जुलै रोजी अंतिम मान्यता मिळाली आहे.सदरचा निधी नगरविकास विभागाकडुन नगरपंचायत ला वर्ग करण्यात आला आहे.लवकरच टेंडर प्रक्रिया होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.यासाठी पाठपुरावा करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे , तालुकाध्यक्ष भास्कर जाधव , शहर प्रमुख गटनेते विवेक नार्वेकर, प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक हरेश पष्टे, आनंद अधिकारी, योगेश महाजन, विनोद कदम, नगरसेविका विमल पष्टे, मिताली भोपतराव, मनीषा अधिकारी व भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.