Breaking News
recent

पर्यटन स्थळांवर जाण्यास शासनाने घातले पायबंद?



        स्थानिकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पर्यटन स्थळांवर करोडोंचा निधी खर्च पर्यटन प्रेमी मध्ये संतापाची लाट

   ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पाणीसाठे महामार्ग, धबधबे या ठिकाणी शासनाच्या पर्यटन विभागाकडून करोडो रुपयांचा निधी खर्च घालून दरवर्षी पर्यटन क्षेत्रांचा विकास केला जात आहे. मात्र पावसाळ्यात पर्यटकांना या ठिकाणी जाण्यासाठी दरवर्षी सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून पायबंद घातला जातो. जर पर्यटकांना या पर्यटन स्थळांचा आनंद उपभोगता येत नसेल तर दरवर्षी या पर्यटन स्थळांच्या डागडूजी साठी आणि सुशोभीकरणासाठी करोडोंचा निधी कुणासाठी खर्ची घातला जातो. असा यक्षप्रश्न पर्यटन प्रेमीकडुन विचारला जात आहे.या शिवाय पावसाळ्यात या ठिकाणी स्थानिक गोरगरीब चहा मका इतर खाद्यपदार्थ विक्री करून त्यामधून मिळणाऱ्या मोबदल्यावर  आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर देखील कुऱ्हाड पडली आहे.

    शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला, जांभे धबधबा, अशोका धबधबा, कुंडण धरण,भातसा नदीवरिल घाट,खरिड तलाव,चेरवली मठ आदी ठिकाणी शासनाच्या पर्यटन विभागाकडून करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र यामधील पाणीसाठे व धबधबे या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी 30 ऑगस्ट पर्यंत जाण्यास पायबंद घातल्याने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटन प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

        शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रतिबंध घालण्याऐवजी या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्याबाबत विचार करायला हवा होता. काही नियमावली आखून पर्यटकांना या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देणे द्यायला हवी होते.-  शिवसेना उबाठा  शहापूर तालुकाप्रमुख

            शहापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या आजूबाजूला आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. पावसाळ्यात रोजगार नसल्याने पर्यटन स्थलांवर चहा,मका व इतर खाद्यपदार्थ विक्री करून आदिवासी बांधव आपला उदरनिर्वाह करत असतात. शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे.-  शिवसेना उबाठा  जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे

Powered by Blogger.