सोलापूर जिल्हा पोलिसांचा संग्रामपूर व टुनकी येथे छापा. आरोपीकडून 24 लाख रुपये जप्त.
■ संग्रामपूर- टुनकी येथे सोलापूर पोलीसांचा छापा
■| ३ आरोपी ताब्यात २४ लाखाची रोकड जप्त खळबळ
■ पोलीसांचा सिनेस्टाईल आरोपींच्या कारचा पाठलाग
■ पैशाचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
सोनाळा माळशिरस जिल्हा 16 जूलेच्या भल्या पहाटे संग्रामपूर व टुणकी येथे छापा टाकला यावेळी तीन आरोपींना ताब्यात घेतल त्यांच्या जवळचे 24 लाख रुपयाची रोख जप्त केली आहे या गोपनीय पोलीस कारवाईमुळे सर्व दूर एकच खळबळ उडाली आहे 25 लाख रुपयाच्या बादलीत 2 हजार नोटाचे सव्वा कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले व शेतकऱ्यांची 25 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा कलम 420 चा गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील माळी सिरस पोस्टमध्ये 15 जुलै च्या रात्री आठ वाजता दाखल झाला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माळशीरस पोलीसांनी संग्रामपूर येथे शे शकील उमर रा धामणगाव ( गोतमारे ) हली मुक्काम तामगाव पोस्टे लगत संग्रामपूर याला ताब्यात घेतले तर टुनकी येथे शिवाजी लोणकर यास त्याचे घरी त्यांचा मुख्य साथीदार नवनाथ उर्फ नाथा रा वाघोली जि पुणे यांना ताब्यात घेतले.
यावेळी आरोपीनी वापरलेली इटीका कार एम एच १२ यु एफ १०९९ ताब्यात घेतली आहे. संग्रामपूर येथून ८ लाख व आरोपी माळशिरस पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार अधिक वृत्त असे की ग्राम मेडद ता माळशिरस येथील फिर्यादी नामदेव जयराम वळकुंदे वय २९ वर्षे यांना २५ लाख रकमेच्या ऐवजी २ हजाराच्या नोट असलेली सव्वा कोटी देण्याचे आमीष दाखवण्यात आले. व २५ लाख रुपयांची रक्कम नामदेव वळकुंदे यांचे मामा सोमनाथ राघू वाघमोडे यांचे राहते घरी भांबुर्डी (खोरे वस्ती ) ता माळशिरस येथे शनिवार १५ जुलै च्या दुपारी ३ वाजता यातील आरोपीनी पोबारा केला अशी फिर्याद माळशिरस पोस्टे मध्ये दाखल झाली. यावरून पोलीसांनी उपरोक्त मुख्य आरोपी विरुद्ध कलम ४२० ३४ नुसार गुन्हा दाखल केला व तातडीने तपासचक्र फिरवल व आरोपीचा माग काढत रात्रभर पाठलाग केला व तामगाव (संग्रामपूर ) पोस्टे गाठत आरोपीचा शोध घेवून ही धाडसी कार्यवाही केली आहे. तामगाव पोस्टेमध्ये उपरोक्त कार्यवाहीचा साना टाकून ३ आरोपींना घेऊन दुपारी १ वाजता माळशिरसकडे रवाना झाले. टुनकी हे सोनाळा पोस्टे हद्दीत आहे
मात्र या कार्यवाही बाबत सोनाळा पोलिसांना काही एक माहिती नसल्याचे समोर आले आहे. पैशाचे आमिष दाखविणाऱ्या टोळीचा या कार्यवाहीमुळे पर्दाफाश झाला आहे.