माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ११०वी जयंती निमित्त मुंबई महानगरपालिकेत रक्तदान शिबीर संपन्न
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहात महानायक वसंतराव नाईक यांच्या ११० व्या जयंती निमित्त बृहन्मुंबई मनपा बंजारा कर्मचारी प्रणित केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने केईएम रुग्णालयातील रक्तपेढी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एकूण १३५ रक्तदात्याने रक्तदान केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर मा.आमदार राजेश राठोड विधानपरिषद सदस्य, मा. संजोग कबरे (विशेष उपायुक्त), मा. संजय कुऱ्हाडे (उप आयुक्त आरोग्य) मा.चंदा जाधव उपायुक्त(घनकचरा व्यवस्थापन), सहायक आयुक्त (बाजार) श्री.प्रकाश रसाळ, प्रमुख कामगार अधिकारी श्री.सुनील जांगळे, प्रमुख कर्मचारी अधिकारी श्रीमती रिमा ढाकणे, मा दिलीप राठोड विभागीय कामगार कल्याण अधिकारी, मा.राधेश्याम आडे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, मा.आकाश जाधव राजकीय विश्लेषक, मा.एकनाथ राठोड राष्ट्रीय कोषाध्यक्ष BBKSS, मा.सुभाष तवंर सामाजिक विश्लेशक, संचालक दयाराम आडे, मा.राजेश चव्हाण जालनेकर सामाजिक राजकीय कार्यकर्ता, मा.अरूण चव्हाण गोर सेना अध्यक्ष, पत्रकार कविराज चव्हाण तरूण भारत, सोबतच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी त्याच बरोबर महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी मा.भाऊचंद राठोड, श्री.आनंदराव राठोड, श्री.शेखर राठोड हे मान्यवर उपस्थित होते. गतवर्षीपासून माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करत असलेल्या केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने गतवर्षी ११० युनिट रक्त संकलन केले होते
तर यावर्षी १३५ युनिट रक्त संकलन करण्यात आले यासाठी केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री.धर्मा राठोड (अध्यक्ष), श्री. निलेश पवार (कार्याध्यक्ष) श्री.भास्कर राठोड (सचिव), श्री. विजय जाधव (खजिनदार) श्री.रमेश आडे, डॉ.व्यंकटेश राठोड, श्रीमती. मिनाक्षीताई राठोड, श्रीमती,सरलाताई राठोड, श्री.आत्माराम चव्हाण, श्री. देविदास चव्हाण, श्री. अविनाश राठोड, श्री.विशाल राठोड, श्री.सुनील राठोड, श्री.गोकूळ राठोड, श्री,आशिष राठोड, श्री.अमोल राठोड, श्री.अविनाश राठोड (अग्निशामक) श्री.डी डी नाईक राठोड, श्री.वसंतराव श्री.निळकंठ राठोड या सर्व पदाधिकाऱ्यांनी. सर्वोतोपरी मेहनत घेतली. बृहन्मुंबई मनपातील कर्मचारी बांधव व रक्तदान करणाऱ्या सर्वच रक्त दात्याचे कर्मचारी बंधुभगिनीचे केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने मनापासून धन्यवाद व आभार.