Breaking News
recent

हेदुचापाडा गावाचा संपर्क तुटला



                                            विद्यार्थ्यांचा लाकडी पुलावरून जीवघेणा प्रवास

शहापूर तालुक्यातील अति दुर्गम भागातील पिवळी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या हेदुचापाडा या ठिकाणी आदिवासी कुटुंबाची १९ घरे आहेत. तर एकूण २३ विद्यार्थी पिवळी येथील किल्ले माहुली शाळा व रताळे पाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर देखील  येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

     आजतागायत हेदुचापाडा येथे वीज आणि मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता सुद्धा नाही. दोन दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे येथील आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना आणि स्वतःला ये-जा करण्यासाठी येथील ओहोळावर बांधलेला तकलादू लाकडी पूल देखील पावसाच्या पाण्यात बुडाल्याने हेदुचापाडा रहिवाशांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. एरवी विद्यार्थी आणि पालक याच लाकडी पुलाचा वापर करून ये-जा करत असतात. हा जीवघेणा प्रवास कधी संपणार असा यक्ष प्रश्न येथील आदिवासी बांधवांना पडला आहे. दरम्यान या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे ठाणेजिल्हा कातकरी प्रमुख माळू हुमणे, सचिव प्रकाश खोडका, युवा प्रमुख रुपेश अहिरे यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसाने लाकडी पूल बुडाल्याने येथील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.  


Powered by Blogger.