मातंग समाजातील दिपक शेजवळ चे हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी द्या — रिपब्लिकन सेनेची मागणी
प्रती चिखली :— औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथील मातंग समाजातील दिपक शेजवळ चे हत्याकांड करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावे असे निवेदन दिनांक 14/ 5/ 2023 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला लटकवलेले आहे. अतिशय सुनियोजितपने हे हत्याकांड झालेले आहे. या प्रकरणी होत असलेल्या तपासातील हलगर्जीपणाचा आम्ही बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो वाळूज एमआयडीसी मध्ये कंपनीत काम करणारा मजूर आई वडिलांचा हा मुलगा आहे.
गरीबी, दारिद्र्य याच्याशी झुंज देत देत आंबेडकरी चळवळीत सक्रिय अशा हा कार्यकर्ता होता. शाखा त्यांनी गावात उघडली होती. आई बापाला भेटायला आला, रात्री एक कॉल येतो तो बोलत बोलत बाहेर जातो आणि परत येतच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अशा लटकलेले अवस्थेत त्याचा मृतदेह आढलून आला आहे. अतिशय थंड डोक्याने त्याचं हत्याकांड झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करावी, आधुनिकपने तपास करावा या प्रकरणाचा तात्काळ तपास झाला पाहिजे.
गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी. आई वडिलांची जबाबदारी एकट्यावर होती. तो आंबेडकरी कार्यकर्ता होता सर्व बाजूने तपास झाला पाहिजे. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांची जयंती असताना जयंतीच्या तोंडावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ चे लेकरं असे मारले जात आहेत. कायद्याचा धाक राहिलेला नाही, या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम चालू आहे बहुजन समाजावर रोज कुठे ना कुठे अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात चालू आहे महाराष्ट्र सरकारने अशा जातीवादी गावगुंडांना भर चौकात नेऊन फाशी देण्यात यावे
फुलंब्री हे जातीयतेचे, गुन्हेगारांचे केंद्र होत चालेल आहे. सत्ताधाऱ्यांच्या बळावर येते अन्याय वाढत चालले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये दिला आहे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीम भाई, चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, चिखली शहर उपाध्यक्ष रमेश अंभोरे, चिखली युवा उपाध्यक्ष सोहेल सौदागर, तालुका सदस्य अरुण जाधव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.