श्री रामभक्त प्रतिष्ठानने केले वृद्धाश्रमात फळ फराळ वाटप
वृद्धाच्या हस्ते नवीन बुलेट गाडीचे पूजन
चिखली -:- श्री रामभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर इटकर याच्या वाढदिवसाच्या निमित्त ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ फराळ वाटप करण्यात आले.
तुकाराम आश्रय वृद्धाश्रम येथे आज भेट देऊन, श्री रामभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर इटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी बुलेट गाडी घेतली तिचे पूजन वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबा यांच्या हस्ते करण्यात येऊन वृद्धाश्रमातील वृद्धाच्या औषधी साठी आर्थिक मदत केली. तसेच गोदरीचे सरपंच भरत जोगदंडे यांच्या हस्ते वृद्धाना फळ फराळाचे वाटप करण्यात आले. या छोटेखाणी कार्यक्रम साठी अवर्जुन यावेळी उपस्थित श्री रामभक्त प्रतिष्ठानचे स्वप्निल मोरे, श्याम साळवे, ऋषिकेश सोनुने, सुनिल गांडुळे, सुमित वाघ, सागर वैष्णव, उमेश वैद्य, राम झाल्टे, आकाश गायकवाड, राहुल मोरे, यश जायभाय, पंकज उबरहंडे, अनिकेत हिवाळे, समाधान परिहार, प्रथमेश जासूदकर सह श्री रामभक्त प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते हजर होते. यावेळी सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार सौं रुपाली डोंगरदिवे यांनी केले तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धासह इतर उपस्थित होते.