Breaking News
recent

रिक्षा चालकानी वाहतूक नियमनाचे पालन करा- वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटिल



सतोष आमले पनवेल प्रतिनिधी

 नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवतात. वाहतूक नियम पाळत नाहीत. ओव्हरसीट प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. बॅच-बिल्ला लावणे, ओव्हरसीट प्रवासी वाहतूक करू नये, विशिष्ट ठिकाणीच थांबा घ्यावा, असे आवाहन रिक्षाचालकांना पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटिल यांनी रिक्षा चालकांची बैठक घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


           नवीन पनवेल, आजूबाजूची गाव परिसरात दिवसेंदिवस रिक्षाची संख्या वाढत चालली आहे. यामुळे बेशिस्त वाहतुकीमुळे परिसरातील विविध चौकात वाहनांची कोंडी होऊन पादचार्‍यांना त्रास सहन करावा असल्याने नागरीकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. रिक्षा चालकांना शिस्त लागावी या पार्श्‍वभूमीवर पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटिल यांनी नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांची बैठक घेऊन वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा सूचक इशारा दिला. वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना येण्या-जाण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत, अशा पद्धत्तीने वाहने लावावीत, असे त्यांनी रिक्षा चालकांना बजावले. रिक्षांमध्ये मुख्यत: तीन प्रवासी घेण्याची मुभा असताना पाच ते सहा प्रवासी वाहतूक होते. काहीजण संगीत डेक (साऊंड सिस्टिम बाॅक्स) जोरजोरात लावतात. रेल्वे स्टेशन हद्दीतील रिक्षा चालक यांची बैठक घेऊन युनिफॉर्म परिधान करणे, रिक्षा या मिटरप्रमाणे चालविणे व अतिरिक्त प्रवासी न घेणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि रिक्षा मीटर प्रमाणे चालविणे, जास्त भाडे न आकारणे, रिक्षा चालकांजवळ वाहन परवाना, कागदपत्रे पाहिजेत, चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये याबाबत सूचना देण्यात आल्या व मार्गदर्शन करण्यात आले. सदर बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व उपस्थितांना अवगत करण्यात आले. तसेच विशेषतः महिला प्रवाशी यांचेशी सौजन्याने वागण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Powered by Blogger.