Breaking News
recent

खेकडे झाले आदिवासी बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन



उशिरा सुरु झालेल्या पावसामुळे शेतीची कामे लांबणीवर पडलेली असतांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलबद्ध नसतांना आदिवासी बांधवांच्या मदतीला धावून आले खेकडे. आदिवासी बहुल असलेल्या शहापूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर असतांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आदिवासी बांधव आपला जीव धोक्यात घालून रात्रीच्या अंधारात खेकडे पकडण्यासाठी रात्रभर विषारी, बिनविषारी साप, विंचू यांसारख्या जीवघेण्या प्राण्यांपासून आपला जीव वाचवत खेकडे पकडत असतात. 

आदिवासी बांधव आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले जीवन कंठत असतात. रात्रभर खेकडे पकडल्यावर सकाळी बाजारपेठेत जाऊन सफेद खेकडे ७० ते ८० रुपये डझन तर काळे खेकडे मात्र २५० ते ३०० रुपयांना ६ या प्रमाणे आदिवासी बांधव विक्री करून दिवसाकाठी ५०० ते १००० रुपये कमावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. शाकाहारी लोकांसाठी एक प्राणी तर मांसाहारी खवय्यांसाठी एक मेजवानी असे हे खेकडे आदिवासी बांधवांना पावसाच्या सुरुवातीस काही प्रमाणात का असेना मदतीचा हात देत असतात.

Powered by Blogger.