वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा
दिनांक 30ऑगष्ट २०२३ ला वीज वितरण कंपनीच्या सोनाळा विज वितरण कंपनीच्या उपकेंद्र येथे. सोनाळा येथील ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता श्री राम बोदडे यांना निवेदन दिले. टुनकी गावठाण व शेतीचा विज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. एक तास सुध्दा वीजपुरवठा सुरळीत सुरू राहत नाहीं. शेतातील विद्युत वाहिनीवरील ट्री कटिंग झालेली नाहि त्यामुळे वेळोवेळी शॉक सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो, त्यासाठी तात्काळ विद्युत वाहिनीवरील ट्री कटिंग करण्यात यावे. तसेच दिवस भर विजेचा लपंडाव सुरू असतानाच त्यात आणखी भर म्हणून अतिरीक्त इमरजन्सी भारनियमन सुध्दा घेतल्या जाते, इमरजन्सी भारनियमन यानंतर टुनकी येथे घेण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले.सोनाळा उप केंद्राचा भौगोलिक भाग खूप मोठा असूनही परिणामी रात्री लाईन मध्ये बिघाड झाल्यास तासन् तास सर्व परिसरात लाईन बंद राहते
तसेच सार्वजनिक गणेश उत्सव दुर्गा देवी उत्सव तसेच इतर उत्सव दरम्यान लाईन चा नाक त्रास विशेष करून प्रत्येक दिवशी संध्याकाळीच लाईन जाते त्याबाबत योग्य ते उपाययोजना करण्यात यावी दहा ते बारा दिवस सुरळीत लाईन सुरू राहील याबाबत खबरदारी घेण्यात यावी गावातील मिरवणूक जे मुख्य आहे त्या मार्गाने काही ठिकाणी विद्युत तार तसेच विद्युत केबल खाली आलेले आहेत मिरवणूक दरम्यान वाहनांना घरातील कनेक्शन. केबल टच होतात मंडळातील मुलं स्वतः हाताने केबल वर घेऊन मिरवणूक काढता या दरम्यान जीवित हानी होण्याचे टाळता येत नाही. याविषयी योग्य ती कारवाई करण्यात यावी वरील. नमुद मुददान योग्य ती कारवाई होत असलेल्या. नाहक त्रास कमी करण्यात यावी ही विनंती. तसेच अर्जदार आपणास कळविण्यात येते की कोणती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना शुभम शिंगणापूर संजय बावस्कार सौरभ कथे सागर जयस्वाल भगवंता चोरे शुभम वाघ योगेश दुगाने आकाश महाले रवी कोकाटे, उपस्थीत होते.