Breaking News
recent

कोलते इंजिनीअरिंगमध्ये पदवीदान समारंभ संपन्न


मलकापूर- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद,नवी दिल्ली व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई  द्वारा मान्यता प्राप्त  व लोकसेवा शिक्षण बहुद्देशीय मंडळ, मलकापूर द्वारा संचालित पद्मश्री डॉ.व्ही. बी.कोलते कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मलकापूर येथे दि.२६ ऑगस्ट २०२३ रोजी  महाविद्यालयाच्या मुख्य सेमिनार हॉल मध्ये पदवीदान सोहळा सकाळी १० वाजता  पार पडला.

      कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्राध्यापक आय.बी.एम.आर.कॉलेज पुणे येथून आलेले प्रमुख अतिथी डॉ.शरद पाटील ह्यांचा परिचय व त्यांचे शिक्षण क्षेत्रातिल भरीव  कामगिरी बद्दल उपस्थितांना अवगत करण्यात आले. डॉ.पाटील सरांचा बुके व शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल खर्चे यांच्या हस्ते यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.

पदवीदान कार्यक्रमाच्या मागील उद्देश व महत्व प्राचार्य  डॉ. अनिल खर्चे यांनी विषद केले. २०१९-२० ह्या वर्षापासून जगभरात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे अशा प्रकारचा कार्यक्रम होऊ शकला नसल्याचे प्राचार्य यांनी सांगितले. तसेच आपण चार वर्षांचा आपला अभ्यासक्रम पूर्ण करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा पदवी मिळते तो आनंद शब्दात व्यक्त करता येणे अशक्य ठरतो. विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे भविष्य उज्ज्वल व सुखी समाधानी आयुष्य व्हावे त्यांना जीवनात कमीत कमी संघर्ष करून भरभराट व यश मिळावे ह्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करून शिक्षण देणारे आई वडील यांच्या साठी सुध्दा हा दिवस खूप आनंदाचा ठरत असतो. तरुण पिढीने वर्तमानातील आव्हाने स्वीकारून भविष्याकडे पाहावे असे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. खर्चे यांनी यावेळी केले.

      प्राध्यापक डॉ. शरद पाटील यांच्याविषयी बोलतांना त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या पदव्यांच्या बाबतीत सखोल माहिती देतांना सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमोघ मालोकार यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयातून व ब्रांच मधून प्रथम पाच मेरीट येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष बक्षिस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.     

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे अकॅडेमिक डीन डॉ.युगेश खर्चे, प्रा.रमाकांत चौधरी,प्रा.नितीन खर्चे, प्रा.संतोष शेकोकार, प्रा.राजेश सरोदे, प्रा.सुदेश फरपट  व सर्व विभागप्रमुख यांच्यासह प्राध्यापक वृंद बहुसंख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमानंतर सर्व पालकांना अल्पोपहार व चहापान देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित सर्वाचे  व प्रमुख अतिथींचे आभार महाविद्यालयातर्फे डॉ.युगेश खर्चे यांनी मानले.

Powered by Blogger.