Breaking News
recent

एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला शारीरिक संबंधाची मागणी



नागपूर : एकतर्फी प्रेम करीत असलेल्या युवकाने मैत्रिणीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्याशी रस्त्यावरच अश्लील चाळे करीत विनयभंग केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिमांशू रविशंकर चंद्राकार (वय २८, रा. प्रतापनगर) असे आरोपीचे नाव आहे.

हिमांशू हा बेरोजगार असून दारुड्या आहे. घराजवळ राहणाऱ्या एका युवतीशी त्याची ओळख आहे. ती युवती बीसीएला शिकत आहे. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. परंतु, तो तिला नेहमी शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे ती युवती त्याला कंटाळली होती. वारंवार फोन करीत असल्यामुळे युवतीने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. त्यामुळे आरोपी हिमांशूला तिचा राग आला.

मंगळवारी युवती आपल्या दोन मैत्रीणींसोबत घरासमोर उभी असताना आरोपी हिमांशू तिथे आला. ‘तुझ्याशी बोलायचे आहे. बाजुला चल’, असे तो युवतीला म्हणाला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतू, युवतीने विरोध केल्यामुळे आरोपीने तिचे केस पकडून तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. त्यानंतर युवतीच्या मैत्रीणीकडे पाहून ‘तुझ्या मैत्रीणीला माझ्याकडे पाठव, नाहीतर तुला जिवानिशी ठार मारेन,’ अशी धमकी दिली. काही वेळातच आरोपी तेथून पळून गेला. युवतीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Powered by Blogger.