वाईगौळ ग्रामपंचायत व जि.प.प्राथ.शाळामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा
ग्रामपंचायत वाईगौळ तर्फे गावातील प्राविण्य प्राप्त मुलांचा शाल श्रीफल व रु. ५०० रोख देवून गौरव करण्यात आले.
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.प्राथ.शाळा यांच्या प्रांगणात ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अनिल गजाधरजी राठोड हे होते त्यांच्या हस्ते जि.प.प्राथ शाळाचे ध्वजारोहण पार पडले तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहन श्री.उमेश पांडुरंग राठोड (सरपंच ग्रामपंचायत वाईगौळ) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास प.स. सदस्या सौ. रेखाताई श्याम राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. ध्रुव राठोड, माजी सरपंच श्री.जयसिंग राठोड, श्री.गुलाब सोंगे, उपसरपंच श्री.सुधीर वानखडे, ग्रामपंचात सर्व सदस्य व सदस्या, शा.व्यवस्तापण समिती अध्यक्ष श्री.प्रवीण हेमंतकुमार कुटे, शा.व्यवस्तापण समितीचे सर्व सदस्य,व श्री.एकनाथ चिकटे (ग्रामसेवक वाईगौळ), जि.प.प्राथ.शाळाचे मुख्याध्यापक श्री.नितीन पाटील सर, व सर्व शिक्षकवृद् , त.का.बा आश्रमशाळा मुख्याध्यापक श्री बबन राठोड सर व मंगाम सर, ग्रामपंचयात कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, गावातील प्रतीस्थित नागरिक, पालकवर्ग ,विद्याथी, बालगोपाल ,उपस्थित होते.
ध्वजारोहनानंतर लगेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत वाईगौळ तर्फे गावातील प्राविण्य प्राप्त मुलांचा शाल श्रीफल व रु. ५०० रोख देवून गौरव करण्यात येते यामध्ये आशिष हरीचंद राठोड (शरीर सौस्थव्) व स्पर्धेत यवतमाळ येथे द्वितीय क्रमाक पटकावल्याने व राम दशरथ राठोड याने मॅरोथान स्पर्धेत प्रथम क्रमाक पटकावल्या बदल मा.अनिल गजाधरजी राठोड (मा.विज मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच जि.प.प्राथ.शाळाचे शिक्षक श्री.टी.बी.केंद्रे सर यांनी उत्कुस्ट कार्य करून उच्चविद्या विभूषित विद्याथी घडवल्या बद्दल ग्रामपंचायत कार्यालय व समस्त गावकरी यांनी मा.अनिल गजाधरजी राठोड यांच्या हस्ते शाल श्रीफल व रु. ५०० रोख देवून सत्कार करण्यात आले.