कबूतर चोरल्यांचा संशयातून झाडाला उलटे बांधून बेदम मारहाण
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
दि.२६.०८.२०२३ रोजी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कबूतर चोरीच्या संशयातून तीन ते चार जणांना झाडाला उलटे टाकून बेदम मारहाण करण्यात आली आहे पीडित तरुणांना जातीवाचक बोलून शिवीगाळ करण्यात आली आरोपींनी पीडित तरुणांना जर पोलिसांना तक्रार केली तर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी देण्यात आली
पीडित शुभम विजय माघाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी युवराज नाना गलांडे ,मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड ,दुर्गेश वैद्य राजू बोरगे सर्व राहणार हरेगाव तालुका श्रीरामपूर यांच्याविरुद्ध भादंवि कलम३०७,३६४,३४२,५०६,५०४,१४३,१४८,१४९, सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ पीडित तरुणांची भेट घेऊन विचारपूस करण्यात आली पोलिसांना आरोपीला तात्काळ अटक करून कारवाईचा आदेश देण्यात आला यावेळी घटनास्थळी आमदार लहू कानडे, जिल्ह्याचे एस पी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके तालुका पोलीस स्टेशन निरीक्षक चौधरी ,आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात ,जिल्हा विभागीय भीमराज बागुल मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते