संत समाजसेविका मदर तेरेसा यांची जयंती खूप मोठ्या उत्सवात संपन्न
(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )
दिनांक २६,०८,२०२३रोजी भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मा.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी रे.फादर ज्यो गायकवाड,सिस्टर जेनेसिया,सौ.अनिताताई ढोकणे,मा.नगरसेवक हाजी मुख्तारभाई शहा,प्रकाश ढोकणे,प्रा.लेविन भोसले,पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे संतोष मोकळ,डाॅ राजू साळवे,नितिन गवारे,भैय्या भिसे,तौफिकभाई शेख,गोपाल वायंदेशकर,निरंजन भोसले,अर्जून आदिक,सचिन मांडोळे,डाॅ मेहमुद शेख,रंजन व्हावळ,युसुफभाई कुरेशी,रामदास ढोकणे ,कुणाल सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी अनुराधा आदिक म्हणाल्या की संत मदर तेरेसा यांनी आपले समस्त आयुष्य गोरगरिब रुग्णांच्या सेवेसाठी वाहिले.समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही.त्यांनी दिलेल्या शिकवणीवर मार्गक्रमण करणे हिच त्यांना जयंतिनिमित्त खरी आदरांजली राहिल. आलेले सर्व मान्यवरांच्या आभार भागातील नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले