Breaking News
recent

विमुक्त जाती (अ) च्या बांधवांनो,पांढरे वादळ महामोर्चा मध्ये लाखोंच्या संख्येने सामिल व्हा!



पांढेर वादळ महामोर्चामध्ये सामिल होणार -- श्री.डी डी नाईक (सामाजिक कार्यकर्ता)


मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड

समाज बांधवांनी आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ घेऊन शैक्षणिक,राजकीय,आर्थिक विकासाच्या नावाखाली जीवन जगत असताना, आज समाजासाठी काही देन म्हणुन लोकशाही मार्गाने रस्त्यावरच्या लढाई साठी येत्या 23 ऑगस्टला पांढ़रे वादळ महामोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले श्री.डी डी नाईक (सामाजिक कार्यकर्ता) यांनी केले आहे.  गेल्या दोन दशकापासून विजा (अ) या प्रवर्गात बोगस घुसखोरी धुमाकूळ घालत आहे. मूळ विमुक्त जाती (अ) यांना शिक्षण, नोकरी मिळेल मध्ये मिळणाऱ्या सवलती आणि आरक्षणावर यावर जातचोर, बोगस घुसखोर डल्ला मारत आहे. आम्हाला शिक्षण आणि नोकरी पासून वंचित ठेवत आहे. महाराष्ट्र शासन, प्रशासन यावर कोणतेही पाऊल उचलत नाहीत. आमच्या संवैधानिक हक्क आणि अधिकारावर बोगस जात चोर घुसखोरी करीत आहे. शासन, प्रशासन यावर बघ्याची भूमिका घेऊन कोणतेही ठोस पावले उचलत नाही. एसआयटी लावून या सर्व प्रकरणाची तपासणी व्हावी. जातचोर बोगस घुसखोरांना शिक्षण व नोकरीतून बडतर्फ करून त्यांना सजा व्हावी. यासाठी एसआयटी स्थापन झालीच पाहिजे.महाराष्ट्र शासनाच्या 'तळ्यात मळ्यात' धोरणाविरोधात विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. जातचोरी, बोगस घुसखोरी करणाऱ्या विरोधात एसआयटी लागू चौकशी झालीच पाहिजे!

चला म बी जारोछु तम बी आवो एकी हेच बळ मा गोर बंजारा भाईयो आब वेळ आईच एक वेयर आपण समाजेर ताकद दकाळेर अभि नही तो कभी नही एक दिवस..आपल्या संवेधाधिक हक्क अधिकारासाठी! येत्या 23 ऑगस्ट ला छ.संभाजीनगर (औरंगाबाद) साठी संपुर्ण महाराष्ट्रातुन समाज बांधवांनी पांढरे वादळ महामोर्चा साठी,समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवुन देण्यासाठी यायचे आहे. एकच झेन्डा पांढरा वादळ महामोर्चा त  येऊन साक्षीदार व्हायचे आहे.श्री डी डी नायक सामाजिक कार्यकर्ते


Powered by Blogger.